Phone Tapping प्रकरणी Rashmi Shukla जबाब नोंदवणार, Colaba Police Station मध्ये दाखल
पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला आज जबाब नोंदवण्यासाठी कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलीस रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवणार आहेत. राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर आहे. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानंही त्यांना १ एप्रिलपर्यंत दिलासा दिला होता. पण १६ मार्च आणि २३ मार्च रोजी कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार रश्मी शुक्ला वकिलांसह कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv