Aurangabad मधील वैजापूरचे शिवसेना आमदार Ramesh Bornare यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Continues below advertisement

औरंगाबादमधील वैजापूरचे  शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्याविरोधात अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालया. काही दिवसांपूर्वी एका महिलेनं मारहाण केल्याचा आरोप बोरनारे यांच्यावर केला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत होती. पोलिस राजकीय दबावाखाली विनयभंगाचं कलम लावत नसल्याचाही आरोप झाला. अखेरीस पोलिसांनी महिलेचा पुरवणी जबाब नोंदवत या प्रकरणी आमदार बोरनारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याचा राग मनात धरून आमदार रमेश बोरनारे आणि इतरांनी एका महिलेस शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram