Ranvir Singh Inquiry : न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह चेंबूर पोलिस ठाण्यात, दोन तास नोंदवला जबाब
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरणी पोलिसांसमोर हजर झाला आहे. चेंबूर पोलिसांनी रणवीर सिंह याचा जबाब नोंदवला आहे. जवळपास दोन तास त्याची चौकशी आणि जबाब नोंदणी प्रक्रिया सुरु होती. यावेळी त्याची लीगल टीम देखील त्याच्या सोबत पोलीस स्टेशनला हजर होती. या दरम्याने त्याने पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विदेशी कंपनीसोबत या फोटोशूटसंदर्भात झालेल्या काँट्रॅक्टची माहिती देखील रणवीर सिंहने पोलिसांना दिली. याशिवाय येत्या काळातही गरज पडल्यास पोलिसांना सहकार्य करण्याचं आश्वासन अभिनेत्याने दिलं आहे.
Continues below advertisement