Ranji Trophy 2024 : रणजी करंडक फायनलवर मुंबईची घट्ट पकड, मुंबईची एकूण आघाडी 260 धावांची

Continues below advertisement

Ranji Trophy 2024 : रणजी करंडक फायनलवर मुंबईची घट्ट पकड, मुंबईची एकूण आघाडी २६० धावांची
मुंबईनं विदर्भाविरुद्धच्या रणजी करंडक फायनलवर दुसऱ्या दिवशीच आपली पकड घट्ट केली. या सामन्यात मुंबईनं दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात दोन बाद १४१ धावांची मजल मारली आहे. त्यामुळं या सामन्यात मुंबईची एकूण आघाडी २६० धावांची झाली आहे. 
वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणे ५८ आणि अष्टपैलू मुशीर खान ५१ धावांवर खेळत होता. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची अभेद्य भागीदारी रचली. अजिंक्यनं १०९ चेंडूंमधली नाबाद ५८ धावांची खेळी चार चौकार आणि एका षटकारानं सजवली. मुंबईच्या कर्णधाराचं यंदाच्या रणजी मोसमातलं हे केवळ दुसरं अर्धशतक ठरलं. मुशीर खानच्या १३५ चेंडूंमधल्या नाबाद ५१ धावांच्या खेळीला तीन चौकारांचा साज होता. त्याआधी, मुंबईनं विदर्भाला अवघ्या १०५ धावांत गुंडाळून पहिल्या डावात ११९ धावांची मोठी आघाडी घेतली. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शम्स मुलानी आणि तनुष कोटियननं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram