रामदास कदम शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत, 'हे' कारण दिलं
कथित ऑडिओ संभाषणामुळे अडचणीत आलेले शिवसेना नेते रामदास कदम दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती बरी नसल्यानं हजर राहणार नसल्याची माहिती रामदास कदम यांनी दिलीय. परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कदम यांनी केलेल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे कदम यांच्याविषयी शिवसेनेत नाराजी आहे. त्यामुळे रामदास कदम यांना दसरा मेळाव्यात एँन्ट्री मिळणार की नाही याविषयी चर्चा रंगली होती. पण प्रकृती बरी नसल्याचं सांगत कदम यांनी दसरा मेळाव्याला जाणं टाळलंय.