Ramdas Athawale : जावयावर कारवाई झाल्यामुळं Nawab Malik वानखेडेंवर आरोप करताहेत : रामदास आठवले

Continues below advertisement

मुंबई ड्रग्ज प्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. समीर वानखेडे यांच्यावर बोगस जातप्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिकांच्या आरोपांची मालिका सुरु असतानाच समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीनंतर रामदास आठवले यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं. समीर वानखेडे यांच्या केसाला धक्का लागणार नाही, आमची पार्टी त्यांच्यासोबत आहे, असं अश्वासन यावेळी रामदास आठवले यांनी दिलं. नवाब मलिक म्हणतात पिक्चर अजून बाकी आहे. पण या पिक्चरमध्ये माझा रोल बाकी आहे, असं रामदास आठवले पत्रकार परिषदेत म्हणाले. 

नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. क्रांती रेडकर यांनी मला सर्व कागदपत्रं दाखवली. कागदपत्र अधिकृत आहेत. वानखेडे कुटुंबीय बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत. समीर वानखेडेंविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. जर तुमचे काही आरोप असतील तर कोर्टात जा. जावयावरील कारवाईमुळे मलिकांकडून आरोप करण्यात येत आहेत. मलिकांसाठी आमच्याकडे वेळ नाही, असे रामदास आठवले म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram