Ram Kadam :राज कुंद्राने शिल्पा शेट्टीचं नाव, फोटो वापरून फसवणूक करत लोकांना लुटलं: राम कदम

मुंबई : मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कश्या असू शकतात?, असा सवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला. तुम्ही एक सेलिब्रिटी आहात लोकांना तुमच्याबद्दल वाचायला आवडतं, म्हणून त्यावर लिहिलं जात. तुमच्या घरातील गोष्टी जेव्हा इतरांशी संबंधित असतात आणि त्या बाहेरच्या जगासमोर घडतात तेव्हा तुम्ही त्यावर बोलायची बंधनं घालायची मागणी कशी करू शकता?, शिल्पा शेट्टीबाबत लिहायला काही चांगलं नाही, तर तिच्याबाबतीत काहीच लिहू नका, ही मागणी तुम्ही कशी करू शकता?, असा प्रश्नांचा भडीमार करत शिल्पाचा समाचार घेत याचिकेत केलेल्या मागणीनुसार आम्ही तुम्हाला कोणताही अंतरिम दिलासा देऊ शकत नाही असं न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केलं. तसेच या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेल्या सर्वांना 18 ऑगस्टपर्यंत तर शिल्पा शेट्टीला 26 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola