चुकीच्या पोस्ट हटवण्याचे निर्देश देऊ शकत नाही, देशाला पत्रकारितेला पूर्ण स्वातंत्र्य: मुंबई हायकोर्ट
मुंबई : देशातील नावाजलेला उद्योगपती राज कुंद्रापर्यंत पॉर्न फिल्म रॅकेटचे धागेदोरे कसे पोहोचले याची माहिती आता समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासूनच राज कुंद्रा तपास यंत्रणांच्या रडारवर आला. अखेर 19 जुलै रोजी राज कुंद्राला अटक झाली.
5 फेब्रुवारी रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने पॉर्न फिल्म रॅकेट उघड केले. या प्रकरणात पाच लोकांना अटक करण्यात आली. जसा जसा तपास पुढे जात गेला तसे या प्रकरणात अटक होत गेली. या प्रकरणात एकूण नऊ लोकांना अटक करण्यात आली. एप्रिल महिन्यात पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली. मात्र त्यामध्ये राज कुंद्रा यांच्या नावाचा उल्लेख केला गेला नव्हता. पॉर्न फिल्म रॅकेट उघड झाल्यावर सुद्धा राज कुंद्राला याची खात्री होती की तो अटक होणार नाही आणि म्हणूनच त्याने त्याचा प्लान बी सुद्धा तयार केला होता.