Raj Thackeray Thane : तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता - सूत्र
ठाण्याच्या उत्तर सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याआधी भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी तलवार दाखवल्यानं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर काग्रेसचे मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्या कार्यक्रमात तलवार दाखवल्यानंही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी काल ठाण्याच्या सभेत तलवार दाखवल्यानं गुन्हा नोंद होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.