Raj Thackeray Corona : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, मास्क न घालताच कृष्णकुंजवरून रवाना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ही आता कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला कोरोना झाला आहे. राज ठाकरेंना सध्या क्वारंटाईन करण्यात आल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनं माहिती दिली आहे. दरम्यान राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींचे लशीचे दोन डोस पूर्ण झाले होते.