Raj Thackeray Sabha : आज राज ठाकरे काय बोलणार, कुणावर आसूड ओढणार?

Continues below advertisement

आज राज ठाकरे काय बोलणार, कुणावर आसूड ओढणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष लागलंय... मुंबईतील शिवाजी पार्क मैदनात संध्याकाळी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय... यावेळी राज ठाकरेंचं भाषण होणार असून ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय... राज ठाकरे नेमके कुठले मुद्दे मांडणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मशिदीवरील भोंग्यांवर ते काय आवाहन करणार, याकडेही सर्वांचे कान लागलेत... महत्त्वाचं म्हणजे सौदी अरेबियामध्ये रमझानच्या महिन्यात भोंग्यांवर बंदी आणण्यात आलीये, मग महाराष्ट्रात का नाही, अशी भूमिका राज ठाकरे घेऊ शकतात... सभेपूर्वी राज ठाकरेंच्या टीझरमध्ये त्याची झलक दिसते... शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हा पहिला गुढीपाडवा मेळावा आहे... शिंदे-फडणवीस सरकारवर ते कितपत टीका करतात, आणि उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram