Raj Thackeray : ही पवारांचीच खेळी, उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य नाही

Raj Thackeray on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील राजकीय भूकंप (Maharashtra Politics) ही शरद पवारांची खेळी असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, या सर्व सत्तासंघर्षावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेब काहीही म्हणो, हे नेते पाठवल्याशिवाय जाणार नाहीत, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. अजित पवार यांनी 30 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola