Raj Kundra : राज कुंद्रा वापरत असणारं हॉटहिट अ‍ॅपच्या बँक खात्यांच्या व्यवहारांची माहिती 'माझा'वर

पॉर्न व्हिडीओ बनवल्याप्रकरणात अटक केलेल्या राज कुंद्रा यानं त्याचा प्लॅन बीदेखिल तयार ठेवला होता. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अश्लिल व्हिडीओ बनवल्याप्रकरणी अटक केल्यानंतर त्याचा पीए उमेश कामत याच्या मोबाईल चॅटमधून कुंद्राचा प्लॅन बी समोर आलाय. कुंद्रा ज्या हॉटशॉट अॅपवर अश्लील व्हिडीओ अपलोड करत होता, ते अॅप निलंबित केल्यास लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा त्याचा प्लॅन होता. पॉर्न फिल्मची शूटिंग थांबवून त्याच्या बॉलीफेम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मॉडेल आणि अभिनेत्रींकडून लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची तयारी त्यानं केली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola