जगात कुठल्याही नामांकित विद्यापीठानं परीक्षेशिवाय पदवी दिली नाही - UGC उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन

Continues below advertisement

नवी दिल्ली : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली.
यूजीसीची भूमिका पहिल्यापासून परीक्षेचीच होती. जर तेव्हाच हे ऐकलं असतं तर विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागला नसता. परीक्षा न घेता पदवी हे शैक्षणिक दृष्ट्या योग्य नाही. परीक्षा होणारच हे आता स्पष्ट झाले आहे.

काही विद्यापीठांनी आधीच परीक्षा घेतल्या देखील आहेत. 30 सप्टेंबरनंतरही परीक्षा होऊ शकतात. राज्य सरकार त्यांचे प्रस्ताव घेऊन येतील त्याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालात जे निर्देश असतील त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे युजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram