Mumbai Rains: मुंबईत आज संध्याकाळपासून पावसाचा अंदाज ABP Majha
आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईतही आज संध्याकाळपासून पावसाचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक डॉक्टर शुभांगी भुते यांनी वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पाऊस पडेल आणि वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटरपर्यंत असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Tags :
Konkan Rain Marathwada Arabian Sea Central Maharashtra Meteorological Center Scientific Doctor