Piyush Goyal | Mumbai Local| मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही : रेल्वेमंत्री
Continues below advertisement
एकीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत. असं असताना आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणतीही मागणी आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकल कधी सुरू होईल याबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.
केंद्राने केलेल्या नव्या कृषी कायद्यातील गैरसमज दूर करून महत्त्वाचे मुद्दे सांगण्यासाठी आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न त्यांना विचारला असता, मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा अजून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत राज्यसरकार प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही असे रेल्वे मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई लोकल 15 तारखेपर्यंत सुरू करू असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले असले तरी त्यासाठी राज्य सरकार रेल्वे मंत्रालयाला कधी प्रस्ताव पाठवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Continues below advertisement