Mumbai Railway Mega Block : मध्य रेल्वेवर ठाणे-दिवा दोन मार्गिकांच्या कामासाठी 18 तासांचा मेगाब्लॉक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी मध्य रेल्वे मार्गावरून प्रवासाचा बेत असेल तर तुम्हाला आताच नियोजन करावं लागणार आहे. कारण मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामासाठी रविवारी तब्बल १८ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकल, मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्त आज या मार्गाच्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर या मार्गाच्या कामासाठी येत्या रविवारी १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन आहे.