Railway Budget 2020 | अर्थसंकल्पात मुंबईला काय मिळालं ? | ABP Majh
Continues below advertisement
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात खास मुंबई उपनगरीय विभागासाठी असलेल्या एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 550 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळणार आहे. एमआरव्हीसी हे प्रकल्प राबवत आहे. तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारलेल्या मध्य रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थासंकल्पात 7638 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच मुंबईला उत्तर भारताशी जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेला 7042 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
Continues below advertisement