Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांच्या 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement

Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांच्या 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल भाजप किंवा भाजपप्रणित महायुतीतल्या एकाही घटक पक्षानं मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून आपला उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची दक्षिण मुंबई मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी चर्चा सुरु आहे. त्याच नार्वेकरांच्या १४ एप्रिलच्या एका बैठकीतल्या भाषणाचा व्हिडीओ  व्हायरल झाला. ही प्रचारसभा भायखळ्यातल्या हेरिटेज हॉटेलमध्ये पार पडली. या प्रचारसभेत राहुल नार्वेकर यांनी आपण अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचा एक सदस्य असल्याचा दावा केला. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी या प्रचारसभेत नार्वेकरांच्या शेजारच्या खुर्चीत बसल्या आहे. या बहिणीला भावाची साथ निव्व्वळ लोकसभेसाठी नाही तर मुंबईची महापौर होईपर्यंत राहील, असं विधान राहुल नार्वेकरांनी गीता गवळींना उद्देशून केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram