Rahul Kanal IT Raid : संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेआधी मुंबई आणि पुण्यात आयकरची छापेमारी

Continues below advertisement

Rahul Kanal IT Raid : शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकरची छापेमारी करण्यात आली आहे. राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यशवंत जाधव यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram