Rahul Gandhi : छत्रपती शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा,लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मुंबईतून

Continues below advertisement

Rahul Gandhi : छत्रपती शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा,लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मुंबईतून
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा आज शिवाजी पार्कवर होणार आहे.. ठाकरेंच्या होम ग्राउंडवर ही सभा होणार असून या सभेसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आणि बड्या नेत्यांना काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आलंय... या सभेला सोनिया गांधीही उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ इंडिया आघाडी मुंबईत वाढवणार आहे. या सभेला गांधी परिवारातून सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा उपस्थित असतील....तसचं काँग्रेस नेत्यांकडून मिळालेलं निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्विकारलं असून  ते आजच्या राहूल गांधींच्या सभेला उपस्थित राहणार आहेत...  लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिलीच सभा मुंबईत होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram