Oxygen Shortage : टाकीबंद ऑक्सिजनच्या कच्च्या मालाची कमतरता, रुग्ण वाढल्याने पुरवठादारांवर ताण
Continues below advertisement
राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणार तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हास्तरावर कंट्रोल रुम तयार केल्या जाणार आहेत. राज्य आरोग्य सेवा आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
Continues below advertisement