Pandharpur Election : सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सत्ता बदलाबाबत फडणवीसांचं सूचक वक्तव्य

पंढरपूर :  पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते आज मंगळवेढा आणि पंढरपुरात प्रचारसभा घेत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. कोरोना काळात शेतकरी अडचणीत असताना या महावसुली सरकारने गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांची वीज तोडणी करून पाच हजार कोटीची वसुली केली तर मुंबई बिल्डरांना मात्र पाच हजार कोटींची सूट दिली. कारण ते यांना मालपाणी देतात असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या या सभांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं चित्र होतं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola