राणेंच्या दर्शनानंतर दूध,गोमुत्र,फुलं वाहून शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण

Continues below advertisement

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे शिवसेना-राणे यांच्यातील वादाच्या नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले आहे. त्यामुळे दूध, गोमुत्र आणि फुले टाकून शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आहे असं  शिवसैनिकांनी सांगितले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram