Kiran Gosavi : बेपत्ता पंच किरण गोसावीला पकडण्यासाठी पुणे पोलीस लखनऊ मध्ये दाखल
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
26 Oct 2021 11:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आणि तेव्हापासून बेपत्ता असलेले पंच किरण गोसावी अखेर पोलिसांना सापडण्याची चिन्हं आहेत. किरण गोसावी उत्तर प्रदेशात असून त्यांना पकडण्यासाठी पुणे पोलीस लखनऊला पोहोचले आहेत. किरण गोसावी यांचा आर्यन खानबरोबरचा सेल्फी व्हायरल झाल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी सर्वात आधी त्यांच्यावर आरोप केले होते. याच किरण गोसावी यांच्यावर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा आधीपासूनच दाखल असल्याची माहिती या घडामोडींनंतर पुढे आली आणि एनसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं.