पर्यटकांचा हिरमोड होणार, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भुशी डॅमसह इतर पर्यटनस्थळांवर बंदी कायम
Continues below advertisement
लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असताना वरुणराजा बरसू लागला, त्यामुळे पर्यटकांना पर्यटन केंद्र खुणावू लागली. पुणे-मुंबईच्या पर्यटकांनी तर त्यांच्या आवडत्या लोणावळ्याला येण्याचं नियोजन ही केलं असेल. किंबहुना सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इतर धरणांचे पर्याय ते अवलंबण्याच्या तयारीत असतील. पण यंदा त्यांचा हिरमोड होणार आहे. कारण लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असली तरी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement