Mumbai Measles : गोवंडी परिसरात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी जनजागृती
Continues below advertisement
मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबई महापालिकेकडून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना आणि मौलवींना जनजागृतीचं आवाहन करण्यात आलं होतं. गोवंडी परिसरात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठीही प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात मुंबईसह भिवंडी आणि मालेगावात गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. भिवंडी आणि मालेगावच्या तुलनेत मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. मुंबईत आतापर्यंत गोवरचे १७६ रुग्ण आढळले आहेत. तसंच गोवरमुळं आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ६४ जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोवरमुळं रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांचा वयोगट हा प्रामुख्यानं एक ते ४ वर्ष आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Measles