Protest For Missing Girl Palghar : बेपत्ता सदिच्छा सानेचा शोध लावा, पालघरमध्ये मूक मोर्चा
डॉक्टरकीचं शिक्षण घेणारी सदिच्छा साने 29 नोव्हेंबर पासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्यात अजूनही पोलिसांना यश आले नाही, तर मी हे गावातील हितेश पाटील हा तरुण गेल्या सहा महिन्यापासून बेपत्ता आहे त्यामुळे सदिच्छाचे व हितेश चे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवून सदिच्छा चा शोध घ्यावा अशी आर्त हाक सध्या साने कुटुंबीय देत आहेत. याच साठी आज पालघर मध्ये सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये बहुसंख्येने महिला तरुणी तरुण आणि नागरिकांनी सहभाग दर्शवला.