Rohini Khadse : हल्ल्यांना मी घाबरत नाही, हल्ला करणारे शिवसेनेचे पदाधिकारी
Attack on Rohini Khadse : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. मला घाबरवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. मात्र, मी घाबरणार नाही असे रोहिणी खडसे यांनी म्हटले.