Mumbai Property Tax : मुंबईत मालमत्ता कर 15 टक्के वाढणार, महापालिकेकडून नवीन नियमासाठी तयारी सुरू

Continues below advertisement

मुंबईकरांच्या चिंतेत भर घालणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता करात १० ते १५ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. ५०० चौरस फुटांच्या मालमत्तांना हा नवीन नियम लागू नसेल असं मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईतील मालमत्ता कर वाढवण्याचा प्रस्ताव कोविड काळापासून प्रलंबित होता. या प्रक्रियेला आता वेग आला आहे. पालिका प्रशासनाकडून या प्रक्रियेसाठी सनदी लेखापालांची नेमणूक करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram