coronavirus | खासगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयात काम करणं अनिवार्य
खाजगी डॉक्टरांनी 15 दिवस कोविड-19 चे रुग्ण असलेल्या रुग्णालयांमध्ये सेवा द्यावी, असं आवाहन वैद्यकिय शिक्षण-संशोधन मंडळ संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे. दरम्यान, महापालिकेनं वारंवार आवाहन करुनही अनेक खासगी डॉक्टर्सने आपले दवाखाने, नर्सिंग होन सुरु ठेवलेले नाहीत. त्यामुळे मान्यताप्राप्त आणि पदवीधारक डॉक्टरांनी कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते.