Pratap Sarnaik Mumbai : सर्व बदल्या ऑनलाइन करण्याचा पहिला निर्णय घेतला - प्रताप सरनाईक

Continues below advertisement

Pratap Sarnaik Mumbai : सर्व बदल्या ऑनलाइन करण्याचा पहिला निर्णय घेतला - प्रताप सरनाईक

हेही वाचा : 

 बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरुन आता बीडमधील (Beed) जनता रस्त्यावर उतरत आहे. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र 28 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर, या आंदोलनात राज्यातील अनेक भागातून नागरिक सहभागी होणार आहे. काही वारकरी मंडळीही या आंदोलनात सहभागी होत बीडमधील दहशतीविरुद्ध आवाज उठवत आहेत. तसेच, संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी देखील करणार आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) याही बीडमध्ये जाऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत. एबीपी माझाशी बोलताना दमानिया यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्याची मागणी केलीय. तसेच, या हत्याप्रकरणावर पंकजा मुंडे गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. 

संतोष देशमुख यांची लहान मुलगी रडताना दिसते, बोलताना दिसते तेव्हा आपण नागरिक म्हणून काय करतो याची मला खंत वाटते. चांगल्या लोकांनी जर घरात बसून राहिलं तर अशी दहशत निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध कुणीच कसं बोलणार नाही. त्यामुळे, मी ठरवलंय की, 28 डिसेंबरला मी बीडमध्ये जाणार आहे, तिथं जी पदयात्रा आहे, त्यामध्ये वारकरी मंडळीही येणार आहे. मी पदयात्रेत जाऊन यांचे जे जे काळे कारनामे आहेत, त्यांविरुद्ध आवाज उठवणार आहे. जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करुन लढा उभा करणं हे मी माझं कर्तव्य समजते, असे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram