Prakash Surve : 'हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, टेबल जामीन करुन देतो' ' : प्रकाश सुर्वे
शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांनी समर्थकांसमोर चिथावणीखोर भाषण केलंय.. कुणी अरे केलं तर तुम्ही त्याला कारे करत ठोकून काढा... हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो असं म्हणत सुर्वे यांनी ठाकरे गटातील शिवसैनिकांना इशारा दिलाय.... मुंबईत मागाठाणे इथल्या कोकणीपाडा इथं सार्वजनिक कार्यक्रमात सुर्वे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.. सुर्वे यांच्या या चिथावणीनंतर ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक झालेत.. शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं सुर्वे यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेतलीय.. दहिसर पोलीस ठाण्यात सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी तक्रार दाखल करण्यात आलीय...