Mumbai : काय आहे CJ's House प्रकरण? ईडी चौकशीनंतर Praful Patel यांची काय प्रतिक्रिया
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या संशयावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल चौकशी झाली होती. प्रफुल्ल पटेल यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स आणि इक्बाल मिर्चीचा मुलगा असिफ यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. असिफ मेमनच्या अकाऊंटवरुन काही कोटींची ट्रान्झॅक्शन्स पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्समध्ये झाल्याचा संशय आहे. इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा आणि मुलगा असिफ आणि जुनैदच्या यांच्या नावे सीजे हाऊस इमारतीत खरेदी केलेल्या प्रॉपर्टीच्या बदल्यात असिफनं पैसे मिलेनियम डेव्हलपर्सला दिल्याचा संशय आहे. या प्रकरणी ऑक्टोबर 2019 ला ईडीनं प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली होती. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी पटेल यांना ईडी कार्यालयात आज चौकशीसाठी बोलवण्यात आलं होत. पाहुयात या संदर्भात प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.