Income Tax Portal Issue: Infosys चे सीईओ सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाकडून समन्स जारी
Continues below advertisement
आयकर विवरणपत्र भरणाऱ्या करदात्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ई फाईलिंग पोर्टलचे काम सुरळीत झाल्याच दावा इन्फोसिस कंपनी केला आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाची प्रक्रिया सुलभ, सोपी आणि गतिमान व्हावी या उद्देशाने 7 जून रोजी ई-फायलिंग वेबसाईट सुरु केली. मात्र, ही वेबसाईट करदात्यांसाठी त्रासदायकच ठरल्याची अनुभूती येत आहे. करदात्यांवर ई-फायलिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्याची गंभीर दखल घेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासमोर हजर राहण्याचे इन्फोसिसचे (Infosys) एमडी आणि सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांना समन्स जारी करण्यात आला आहेत.
Continues below advertisement