Prabhadevi Elphinstone Bridgeएल्फिन्सटन पूल 2 दिवस सुरु राहणार, बैठकीत तोडगा निघाल्यावर निर्णय होणार
Prabhadevi Elphinstone Bridgeएल्फिन्सटन पूल 2 दिवस सुरु राहणार, बैठकीत तोडगा निघाल्यावर निर्णय होणार
मुंबईतील एल्फिन्स्टन पूल आता दोन दिवस सुरू राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय...त्यामुळे एल्फिन्स्टन पुलावरून आता वाहतूक सुरू झालीय... येत्या सोमवारी पुलाच्या पाडकामाबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे...या बैठकीत काय तोडगा निघतो त्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे...तोपर्यंत हा पूल सुरूच राहणार आहे...पुलाच्या पाडकामाविरोधात स्थानिकांनी विरोध केला होता...नागरिक अक्षरश: रस्त्यावर उतरून पुलाच्या कामकामाला विरोध करत होते...पूल तोडा मात्र स्थानिकांचं पुनर्वसन याच भागात करा, अशी मागणी करण्यात आली होती...दरम्यान आता सोमवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे...
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 26 April 2025
पहलगाम हल्ल्यातल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर, सारे दहशतवादी करत होते लश्कर-ए-तोएबाचं काम, पुलवामा,कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई...
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोधमोहिम, दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर, एनआयएसह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात
मार्च महिन्यात निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ, लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात पाच कमांडर्सनी रचला कट, पाकिस्तान आर्मी, आयएसआयचाही कटात सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे
पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, भारताचा निर्धार, सिंधू कराराला स्थगिती तीन टप्प्यांत दिली जाणार...दिल्लीतल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय...
पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या काश्मिरी तरुणाच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे यांची पाच लाख रुपयांची मदत, आदिल हुसेन शाहचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू, आदिलमुळं वाचले अनेक पर्यटकांचे प्राण...