ABP Majha Headlines 8.00 AM 25 April 2025 Maharashtra News सकाळी 8.00 च्या हेडलाईन्स
ABP Majha Headlines 8.00 AM 25 April 2025 Maharashtra News सकाळी 8.00 च्या हेडलाईन्स
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर... श्रीनगरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार... पहलगामला जाण्याची शक्यता..
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींना भेटणार
हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल, त्याला पाठिंबा, राहुल गांधींसह विरोधकांचं आश्वासन...पाकिस्तानवर निर्बंध घालण्याच्या भूमिकेलाही विरोधकांचं समर्थन.
भारतानं नाकेबंदी केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड, शिमला करार रद्द करण्याचा इशारा, भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, भारतासोबतचा व्यापरही स्थगित
डोक्यावर गो प्रो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यासमोर बाबांना गोळी मारली....संजय लेलेंच्या मुलानं सांगितला मन सुन्न करणारा अनुभव
पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करुन भोंदू बाबाकडून तीन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, नागपुरातील धक्कादायक घटना, भोंदूबाबासह तीन जण अटकेत
मुंबईकरांना लोकल, मेट्रो, मोनो रेल, बेस्टचा प्रवास एकाच तिकीटावर करता येणार..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती..मे महिन्यात एक तिकीट सुविधा सुरू होण्याची शक्यता