Vashi Bridge : माजी आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न,वाशी पुलावरून उडी मारताना पोलिसांनी रोखलं
Continues below advertisement
वाशी पुलावर शनिवारी एक आमदाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र मानखुर्द वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवून त्यांना समजावून पुलावरून बाजूला केले आणि मानखुर्द पोलिसांच्या हवाली केले. मात्र सदर पूल वाशी पोलिसांच्या हद्दीत असल्याने या आमदार पत्नी ला वाशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. शनिवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान एक महिला वाशी पुलावर रडत उभी आहे, अशी माहिती मानखुर्द वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि हवालदार तुषार ढगे यांना मिळाली.
Continues below advertisement