वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करा, कर्मचाऱ्यांच्या संपावपरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Continues below advertisement

सरकारने वीज कर्मचाऱ्यांना आजच्या आज फ्रंटलाईन वर्कर जाहीर करावे, जे वीज कर्मचारी कोरोना काळात रस्त्यावर उतरून रुग्णालयांमध्ये जाऊन वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमध्ये अनेक वीज कर्मचाऱ्यांचा जीवही गेलाय आणि तरी ही त्याच वीज कर्मचाऱ्यांना सरकार फ्रंटलाइन वर्कर मानत नाही हे दुर्दैवी असल्याची टीका माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कोणता ही मंत्री सिरीयस नाही, विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत वीज कर्मचाऱ्यांच्या हिताचा मुद्दा कॅबिनेटमध्ये ठेवण्यात ही अपयशी ठरल्याचा आरोप ही बावनकुळे यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram