Palghar Accident:डहाणूमध्ये पोलीस निरीक्षकच्या गाडीनं दोघांना उडवलं,API सुहास खरमाटेंवर गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
06 Nov 2021 11:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भरधाव गाडीनं बाईकला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात बाईकवरील दोन जण जखमी झालेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे स्वतःच गाडी चालवत होते आणि अपघातानंतर एक टायर फुटलेला असतानाही त्यांनी गाडी 18 किलोमीटर पुढे नेली आणि डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात ती पार्क करून पसार झाले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.