Thane Alcohol : Yeoor परिसर बनला मद्यापींचा अड्डा, येऊरमध्ये येणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी
येऊर हा गटारी साठी मद्यपींचा फेव्हरेट स्पॉट. त्यामुळेच पोलिसांनी देखील इथे मोठा बंदोबस्त लावलाय. येऊर मध्ये जाणाऱ्या आणि येऊर मधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. विनाकारण फिरायला जाणाऱ्या लोकांना घरी पाठवले जात आहे. तर पार्टी करून येणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. अशाच एका रिक्षातून दारूच्या 3 बाटल्या घेऊन जाताना एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात देखील कैद झाले. पोलिसांनी ताबडतोब रिक्षा वाल्यासह प्रवाशांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. अशा प्रकारे पोलीस आणि वन विभाग आज काटेकोर पणे येऊउरवर लक्ष ठेऊन आहेत.