Mumbai Crime : मुंबईच्या जान शेखला राजस्थानमधून अटक; घराच्या आजूबाजूला राहणारी लोकं म्हणतात...

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशात बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची त्यांची योजना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी एक मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. मुंबईत राहणाऱ्या समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता,,,मुंबईच्या धारावी मध्ये जान मोहम्मद यांचा घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचा म्हणणं आहे की जान मोहम्मद तीन दिवस पूर्वी आमच्यासोबत चाहा घेतला आणि कधी भेटला  सलाम दुवा करतो, तो पेशाने ड्रायव्हर होता गाड्या चालवायचं आणि धारावी परिसरात बऱ्याच वर्षापासून राहत होता. आम्हाला कधी वाटला नाही होता अशा पद्धतीचा पाऊल उचलणार आहे. आम्ही सुद्धा टीव्हीवर बातमी बघून आम्हाला सुद्धा धक्का बसला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola