संकट निवारणाचं आमिष दाखवत फसवणूक, पोलिसांकडून आरोपीला अटक

पैस लुटण्यासाठी कोण काय करेल काही सांगता येत नाही. तुमच्या घरातल्या संकटाचं निवारण करतो असं सांगत तृतीयपंथी बनून लुटणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यायेत. जितुभाई जव्हेरभाई परमार असं या बोगस भामट्याचं नाव आहे. घराबाहेर काळी फुली मारुन तो तुमच्यावर घोर संकट आलंय असं कुटुंबियांना सांगायचा. त्यानंतर अंगातलं सगळं सोन घरातल्या माणसांना रुमालात ठेवायला सांगून ते सोनं घेऊन पळ काढायचा. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्याने असे बरेच गुन्हे केलेयत. पोलिसांनी मेडिकल केल्यानंतर आरोपी तृतियपंथी नसल्याचं लक्षात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola