PM Modi Mumbai Road Show Full Video : सोमय्यांचा डान्स, लोकांची गर्दी! नरेंद्र मोदींचा UNCUT रोड शो

Continues below advertisement

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संध्याकाळी पावणे सात वाजता मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रोड शो (Narendra Modi Mumbai Ghatkopar Road Show)  होणार आहे. भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होणार आहे. घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल जवळून मोदींच्या रोड शोला सुरुवात होणार असून घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ त्याचा समारोप होईल. यामुळे ईशान्य मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी घाटकोपरच का निवडण्यात आलं याला महत्त्वाचं राजकीय कारण आहे. मोदींच्या रोड शोचा परिणाम हा मुंबईतील सातपैकी पाच लोकसभा मतदारसंघांवर थेट पडणार आहे. 

मोदींचा रोडशो घाटकोपरमधेच का? 

पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत याच भागात रोड शो घेण्याचे अनेक कारणं आहेत. घाटकोपर हा साधारणपणे मध्यवर्ती मतदारसंघ आहे. पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा म्हणून घाटकोपरकडे बघितलं जातं.  इथल्या गुजराती आणि मराठीबहुल भागातील मतदारांना प्रभावित करणं हा सुद्धा एक उद्देश आहे.

या रोड शोमुळे मिहिर कोटेचा यांच्या उत्तर पूर्व  मुंबई मतदारसंघासहीत मुंबईतील पाच मतदारसंघ जोडले जातात. पियुष गोयल लढत असलेल्या उत्तर मुंबईतील दहिसर, रविंद्र वायकरांच्या  उत्तर पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी,  आणि उज्वल निकम यांच्या उत्तर मध्य मुंबईतील साकिनाका-अंधेरी आणि दक्षिण मध्य मुंबईतील राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघातील चेंबूर, गोवंडी हा भाग जोडला जातोय. या परिसरावर मोदींच्या रोड शोचा प्रभाव राहील अशी भाजपची अपेक्षा असेल.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram