PM Modi Interview : मुंबईत येताच ठाकरे-पवारांवर जहरी वार; Road Show मधून पीएम मोदी EXCLUSIVE
मुंबई: आमच्यावर टीका करणारे हे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी आहे, खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी ही एनडीए सोबत असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जे लोक आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार अशा टोला मोदी यांनी पवार-ठाकरेंना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी पवार -ठाकरेंवर टीका केली.