PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी मुंबईत, राज्यपाल, सीएम, डीसीएमकडून स्वागत
abp majha web team
Updated at:
14 Oct 2023 06:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्या वेळापूर्वी मुंबईत दाखल झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१व्या अधिवेशनाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते काही क्षणांत पार पडणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडतोय. मंगळवारी या अधिवेशनाची सांगता होणार आहे. २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत भारतही असण्याची शक्यता आहे. यासाठी बोली लावण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. तरीही, यजमानपदाच्या शर्यतीत भारत असू शकेल असे संकेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी दिले आहेत.