Dadar Market Crowd : दादरकरांना कोरोनाचं भय नाही? गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी फूलबाजारात प्रचंड गर्दी
Continues below advertisement
मुंबई : राज्यात दोन दिवस कडक लॉकडाऊन सर्वत्र पाळला गेला. मात्र वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यातल्या बाजारपेठा पुन्हा गजबजल्या. राज्यातील विविध बाजरपेठांमध्ये नागरिकांनी आज पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं. गुढीपाडवा सणानिमित्त खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळाली. कोरोना काळात बाजारपेठांमधील गर्दी धडकी भरवणारी आहे.
Continues below advertisement