Upper Kopar : अप्पर कोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांची कसरत, गर्दीच्या वेळी फेऱ्या वाढवण्याची मागणी

Continues below advertisement

पश्चिम-मध्य आणि हार्बरला जोडणाऱ्या अप्पर कोपर रेल्वे स्थानकात ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांना जीवघेणी कसरत करावी लागते आहे. कारण अप्पर कोपर मार्गावर वसई-दिवा आणि पनवेल मार्गाकरिता मेमू आणि डीएमयू गाड्यांच्या ठराविक वेळा आहेत. परिणामी वसई-खारबांव, भिवंडी, दिवा, पनवेल भागाचा विकास झाल्यानं या स्थानकांवर ही गाडी पकडण्यासाठी मोठी गर्दी होते आहे. त्यामुळे वसईच्या दिशेने आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होतायेत.. त्यामुळे या मार्गावर लोकलची परवनागी असतानाही मेमू आणि डीएमयू मोजक्याच गाड्या 15 वर्षानंतरही चालवल्या जात असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे एकतर या मार्गावर लोकल सुरु करावी अन्यथा या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होते आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा या प्रवाशांनी दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram