कल्याण डोंबिवलीत 4 लाखांहून अधिक मतदारांचे यादीत फोटो नाहीत
कल्याण डोंबिवलीत चार लाखांहून अधिक मतदारांचं यादीत छायाचित्र नसल्याचं उघडकीस आलं आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 16 लाख 49 हजार मतदार आहेत. त्यापैकी 4 लाख 13 हजार मतदारांचं यादीत छायाचित्रंच नाही. बोगस मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदाराचा फोटो असणं निवडणूक आयोगाकडून बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळं कल्याण डोंबिवलीतील मतदार याद्या फोटोसह अद्ययावत करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 12 दिवसांत 4 लाख मतदारांची छायाचित्रं गोळा होतात की या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.