E-Challan | वाहनचालकांनो, सावधान! 10 दिवसांत दंड भरा, अन्यथा होऊ शकते अटक | ABP Majha

Continues below advertisement
वाहनांच्या नियमांचं उल्लंन करणाऱ्यांनी 10 दिवसांत दंड न भरल्यास त्यांना अटकेची कारवाई होऊ शकते. ई-चलान प्रणाली अंतर्गत वाहन, वाहनाची कागदपत्रं किंवा परवानाही जप्त केला जात नाही. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असून चालक ई-चलान थकवतात. तरी, आता ई-चलान भरण्यासाठी आणखी 10 दिवसांची म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत दंड न भरल्यास चालकांना नोटिस पाठवली जाईल. सुनावणीवेळी ते हजर न राहिल्यास त्यांना कोर्टाद्वारे वॉरंट काढून अटक केली जाईल, असं  मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram